टेंभूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राला आॅक्सीजन काॅन्सट्रेटर मशिन भेट
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी (ता. माढा) येथे प्रिसीजन कॅमशाॅफ्ट कंपनी लिमिटेड सोलापूर यांच्या सहकार्याने आॅक्सीजन काॅन्सट्रेटर एक लाख चाळीस हजार रुपये किंमतीची मशीन भेट देण्यात आली.
याकामी कंपनीचे चेअरमन मा. यतीनजी शहा साहेब सौ. सुहासिनी शहा मॅडम,जनसंपर्क अधिकारी श्री माधवजी देशपांडे साहेब, माढ्याचे गटशिक्षणाधिकारी फडके साहेब, योगेश भांगे याचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्या मशीनची खरी उपयुक्तता ओळखून ती उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे, शिवसेना तालुकाप्रमुख व ग्रा पं सदस्य मधुकर देशमुख, ग्रा पं सदस्य गणेश केचे, शैलेश ओहोळ, डाॅ सोमनाथ साळुंके, डॉ.विक्रांत रेळेकर, डाॅ. प्रणिता खोटे, डाॅ. प्रतिमा वाघमोडे, डॉ. क्रांती माने, उजनीनगर केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संतोष वरकुटे सर, विजय लोंढे सर, संजय व्यवहारे सर, संजय लांडगे सर, अतुल घुले सर,औषध निर्माता संतोष लोंढे, परिचारिका अर्चना कोळी, किशोर घेचंद, धनवे, कुंभार इ.उपस्थित होते.
प्रिसीजन उद्योग समूह व योगेश भांगे सर यांच्या सहकार्याबद्दल टेंभुर्णी परिसरातील शिक्षक बांधव व डॉक्टरांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा