*बहुजन परिषदेची इंदापूर तालुका* *अध्यक्षपदी अनिल* *मोहिते यांची निवड...*
*प्रतिनिधी रेडा*
*शशिकांत सोनटक्के*
बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सराफवाडी ता इंदापूर याठिकाणी बहुजन समाजाच्या विकासाकरिता परिषदेचे आडवा बैठक पार पडली,
बहुजन परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता बाबर , सरचिटणीस विजय गायकवाड,खजिनदार भगवान पासगे, तालुका अध्यक्ष अनिल मोहिते, तालुका उपाध्यक्ष राजु गायकवाड, संजय कुचेकर, सुनिल आरडे ,बिजे मिसाळ, आझाद मुलाणी ,सुधीर लोंढे, बाळासाहेब मिसाळ, कायदेशीर सल्लागार ,ॲड नारायण ढावरे आदी पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते,
बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला,
यामध्ये तालुक्यामधील सर्व गावातुन समाज बांधवांची जनगणना करणे त्यांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या अंडी-अडीचणी जाणून घेणे व त्या सोडविण्याचा नव युवक -रोजगार निर्माती करणे तालुक्यातील प्रत्येक गावोगावी परिषदेची शाखा स्थापन करून संघटनात्मक बांधणी करणे, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली,
बहुजन परिषदेच्या मिडीया प्रमुख पदी दिपक खिलारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, दरम्यान बहुजन परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता बाबर यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे बहुजन परिषदेच्या पदाधिकारी सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा