Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुळजाभवानी महाविद्यालयाच्या एन. सी. सी. छात्रांचे " ट्री प्लॅन्टेशन फ्राॅम होम*


*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुळजाभवानी महाविद्यालयाच्या एन. सी. सी. छात्रांचे " ट्री प्लॅन्टेशन फ्राॅम होम*

दिनांक 5-06-2021- तुळजापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयाच्या एन. सी. सी. विभागाच्या वतीने "जागतिक पर्यावरण दिना" निमित्त वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
सद्य परिस्थितीत सर्वत्र कोरानाचे सावट असतानाही सामाजिक भान ठेवून 'वृक्षारोपण' काळाची गरज ह्या सहेतुक भावनेने महाविद्यालयाच्या एन. सी. सी. छात्रसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या गावी घराच्या आजूबाजूच्या परिसरात व शेतात कोरानाचे सर्व नियम पाळून अंजीर, वड, पिंपळ, आंबा, चिंच, अशोक इ. वेगवेगळ्या जातीच्या रोपांची लागवड करून त्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचा मानस छात्रसैनिकांनी व्यक्त केल्याचे एन. सी. सी. ऑफिसर मेजर प्रोफेसर डाॅ. वाय. ए. डोके यांनी कळविले आहे. या उपक्रमात विशेष सहभाग कॅडेट वैभवी भोसले, भावना रोडे, दुर्गा कदम, दिनेश मगर, ओंकार वट्टे, मयुरेश वट्टे, सिद्धार्थ माडजे,श्रीकांत लोहार, लखन घाडगे,अक्षय सुरवसे या छात्रसैनिकांचा होता. या कार्यक्रमाची प्रेरणा व मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य  डाॅ. एस. एम. मणेर, 53 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन, लातूर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील अब्राहम, ॲडम ऑफिसर कर्नल देवेष बहुखंडी, सुभेदार पांडुरंग बोरे, नाईक सुभेदार संतोष भोसले यांचे लाभले.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा