Breaking

शुक्रवार, १८ जून, २०२१

माढा तालुक्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू एक हजार बेडचे कोविड सेंटर सुरू करणार, रणजितसिंह शिंदे.



माढा तालुक्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू एक हजार बेडचे कोविड सेंटर सुरू करणार, रणजितसिंह शिंदे.

             कुर्डुवाडी प्रतिनिधी
     कोरोनाची दुसरी लाट वसरणी असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पिंपळनेर ता.माढा येथे १ हजार बेडचे ऑक्सिजन व सुसज्ज सुविधायुक्त असे कोविड केअर सुरू करण्यात येणार असून यासाठीची तयारी सुरू झाली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य
 रणजीतसिंह शिंदे यांनी सांगितले. 
             कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कुर्डूवाडी येथील पंचायत समितीने मध्ये आरोग्य अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य आदींची बैठक घेण्यात आली, यावेळी विविध  मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी शिंदे बोलत होते.
        यावेळी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, माजी उपसभापती बंडू नाना ढवळे, पंचायत समिती सदस्य सुरेश बागल, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी थोरात आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
       रणजितसिंह शिंदे पुढे म्हणाले की कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता एक हजार कोविड केअर सेंटर उभे करण्यात येणार असून यासाठी कारखान्यातील व पंचायत समितीतील कर्मचारी कामकाज पाहणार आहेत.  याठिकाणी उपचार घेणाऱ्या रूग्णांसाठी चहा, नाश्ता, जेवण औषधे आदी मोफत सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच या दरम्यानही कोरोना सेंटर कमी पडत असे वाटल्यास टेंभुर्णी, कुर्डूवाडी, मोडनिंब, माढा, करकंब, श्रीपुर आदी ठिकाणी गरजेप्रमाणे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच माढा आलेगाव, बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात व खाजगी रुग्णालयामध्ये असे एकूण १०० ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर बायबॅक मशीन व व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत.
   
         कोरोना रुग्णांना होम होमकोरंटाईन पूर्णपणे बंद करण्यात आले असून अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच उपचार घ्यावे लगणार आहेत. ज्या गावांमध्ये रुग्ण जास्त आढळतील  तेच गाव पूर्ण लाॅकडाऊन करण्यात येणार असून गावातील एकही नागरिक बाहेर जाणार नाही, बाहेरचा नागरिक गावात जाणार नाही अशा पद्धतीने काम  करण्याच्या सुचेना दिल्या आहेत. याच बरोबर मोठ्या शहरामध्ये रुग्ण संख्या जास्त आढळेल ते शहर पुर्ण त्वरित बंद केल्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होईल. यासाठी  जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात येणार आहे.
             सभापती विक्रमसिंह शिंदे म्हणाले की कोरोना तिसरी लाट लक्षात घेता  रूग्णांसाठी चेस्ट फिजिशियन डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची शंभर टक्के भरती करावी यासाठी  जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
               बंडूनाना ढवळे म्हणाले की एक हजार कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांसाठी आरोग्य सुविधा सह मनोरंजनाच्या सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहे. याठिकाणी  स्वतः लक्ष देऊन कामकाज पहाणार आहे. यावेळी कामचुकार करणाऱ्याची हायगय  केली जाणार नाही.
-------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा