Breaking

गुरुवार, १० जून, २०२१

रिधोरे ता.माढा येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने दुध दर वाढीसाठी आक्रमक आंदोलन....


*रिधोरे ता.माढा येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने दुध दर वाढीसाठी आक्रमक आंदोलन....*
कुर्डूवाडी प्रतिनिधी/अरुण कोरे

कुर्डूवाडी बार्शी रोड वर असलेल्या येथे आज आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रिधोरे ता.माढा जि.सोलापूर येथे दुधाच्या पडलेल्या दराबाबत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चाबूक फोड आंदोलन करण्यात आले.
          महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुधाची अंघोळ घालून गाईच्या दुधाला लिटरला 30 रुपये आणि म्हशीच्या दुधास लिटरला 50 रुपये दर मिळण्यासाठी या सरकारला लवकर बुद्धी सुचावी यासाठी रयत क्रांती संघटनेकडून एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. लवकर निर्णय नाही घेतला तर भविष्यात आंदोलन उग्र होऊ शकते याची सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
  रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक बळीराम गायकवाड,जिल्हा कार्याध्यक्ष आण्णा जाधव,रयत क्रांतीचे आप्पा गवळी,प्रशांत करळे,सयाजी गायकवाड,दिंगबर गवळी,राजेंद्र गायकवाड,महादेव गायकवाड,भारत गायकवाड,अतुल ढोरे,गजेंद्र शिंदे,समाधान गायकवाड,दयानंद रगडे,पांडुरग पंडित,शिवाजी गायकवाड,विकास गायकवाड,सतीश गायकवाड, व कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा