Breaking

सोमवार, २१ जून, २०२१

कंदर येथीलआदित्य लोंढेचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश


कंदर येथीलआदित्य लोंढेचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश

कंदर: सध्या इयत्ता दहावी मध्ये कंदर ता.करमाळा येथील आदित्य लोंढे याचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत आर्थिक दुर्बल प्रवर्गातून राज्यात बारावा येण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून ९४३११ विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. सध्या आदित्य लोंढे टेंभुर्णी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे शिकत आहे. त्याच्या निवडीबद्दल  आदित्य व त्याच्या पालकांचा सत्कार स्कूलच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय डी. टी. गोंजारी, पर्यवेक्षक एम.एस. भुजबळ, आर. टी. लष्कर, एम. आय पवार तसेच याप्रसंगी प्रशालेतील  एन एस. बी. मिरगणे , एस.के.शिंदे, जी.एन.अवघडे, माजी आदिनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे, आदी ग्रामस्थ  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा