दासरी माला दासरी समाजाला स्वतंत्र लघू महामंडळ मार्टी - देण्यात यावे - प्रा. गंगाधर चेपूरवार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
हिंगोली - सन्माननीय मा. श्री. जयंत पाटील साहेबांना दासरी माला दासरी समाजासाठी लघू महामंडळ देण्याची मागणी व प्रायोगिक तत्त्वावर 100 कोटीचे आर्थिक पँकेज मंजुर करण्यात यावे व इतर अन्य मागण्यांसाठी चे निवेदन आज हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे देण्यात आले असून, स्वतंत्र महामंडळासाठीची मागणी निवेदनाद्वारे प्रा. गंगाधर चेपूरवार ह्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यावेळी प्रा. गंगाधर चेपूरवार ह्यांच्या सह युवक संघटनेचे मुख्य कार्यकारी पदाधिकारी मा.दिलीप चेपूरवार, उपाध्यक्ष मा.साईनाथ चेपूरवार, कोषाध्यक्ष प्रा.आशिष चेपूरवार, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा चेपूरवार, महासचिव पवन सादुलवार,शहर अध्यक्ष विकास चेपूरवार, कळमनुरी तालुकाध्यक्ष श्री. परमेश्वर ओलमवार, हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्री.राम बोंपिलवार, सदस्य जयराम बोंपिलवार, राम चेपूरवार, लक्ष्मण चेपूरवार,श्याम चेपूरवार, शंकर चेपूरवार, बालाजी चेपूरवार, आकाश चेपूरवार, निशान बोंपिलवार सह अन्य दासरी माला दासरी समाज युवक संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी व दासरी माला दासरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा