वयोवृध्द ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यासाठी
निसर्गाने व्यापलेली मोठी बगीचा,नाना नानी पार्क तयार करण्यात यावी, धीरज जाधव यांची मागणी
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील वयोवृध्द ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यासाठी
निसर्गाने व्यापलेला मोठी बगीचा (नाना नानी पार्क ) तयार करण्यात याव या मागणी चे निवेदन दि.२७ जुन रोजी नगराध्यक्ष / मुख्याधिकारी, नगर परिषद कार्यालय, तुळजापूर यांना अॅड धिरज जाधव यांनी दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, तुळजापूर शहर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीची पुण्यपावन नगरी म्हणून महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यात नावलौकि आहे. येणारा काळ हा विविध रोगराईचा असून या मध्ये विशेषतः वयोवृध्द ज्यष्ट नागरीक व लहान बालकांना अधिक प्रमाणात धोका होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
त्या करिता नगर परिषद प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून तुळजापूर शहरातील वयोवृध्द ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यासाठी निसर्गाने व्यापलेला मोठा ऑक्सिजनपूरक निसर्गरम्य बगीचा तुळजापूर शहरातील मख्य ठिकाणी बांधण्यात यावी सदर निसर्गरम्य बगीचेमध्ये ऑक्सिजनपूरक झाडे लावावीत, जेणेकरुन तुळजापुर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. सध्या संपूर्ण जगासह भारतामध्ये महामारी कोरोना या संसर्गजन्य विषाणचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत चालेला दिसत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव झालेली व्यक्ती ऑक्सिजन मिळत नसल्या कारणाने मागील काही दिवसांमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्तवाहिनीमध्ये पहावयास मिळालेले आहे. अशापध्दतीचे पुढील काळात नवनवीन आजार जन्माला येत आहेत.
भविष्यात कोणते आजार उदयास येतील. त्याची कल्पना करणेसुध्दा खूप भीतीदायक आहे. तसेच तुळजापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक पहाटे व सायंकाळच्या वेळेस शारीरिक व्यायाम करणेसाठी शहरातील वाहतूकीच्या ठिकाणी जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत असून त्यांना एक मुख्य निसर्गरम्य ठिकाण मिळण्याकरिता नगर परिषद प्रशासनास करावी. सदर निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आगामी येणाऱ्या सभेमध्ये सदरचा विषय घेण्यात येवन तात्काळ नियोजनबध्द आराखडा तयार करुन तुळजापूर शहरात मुख्य ठिकाणी निसर्गरम्य बगीचा बांधण्यात यावा व शहरातील वयोवृध्द व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, या निवेदनावर भ्रष्टाचार निर्मुलन जिल्हाध्यक्ष अँड धिरज जाधव यांची स्वाक्षरी आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा