विवेक पवार यांची माढा तालुका पोलीस बॉईज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड..........
बेंबळे। प्रतिनिधी। मुकुंद रामदासी
बेंबळे (ता.माढा) येथील महा ई-सेवा केंद्राचे प्रमुख विवेक जीवराज पवार यांची माढा तालुका 'पोलीस बॉईज असोसिएशन' संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे यांनी आमदार बबनदादा शिंदे यांचे हस्ते विवेक पवार यांना प्रदान केले.
सविस्तर वृत्त असे की स्वर्गीय आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना या पोलीस बॉईज संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. ही संघटना पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सतत कार्यरत असून या संघटनेच्या प्रयत्नांमुळेच पोलिसांच्या पाल्यांना भरतीचे वेळी ५% टक्के आरक्षण मिळाले आहे, तसेच पोलिस भरतीच्या मैदानी परीक्षेमध्ये रनिंग साठी 50 सेकंद वाढवून दिले जातात. पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात या संघटनेमार्फत रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, सामुदायिक संरक्षण मार्गदर्शन, पोलिसांचे सामाजिक कर्तव्य व त्या अंतर्गत ग्रामीण पातळीवर शांतता व सुरक्षितता राखणे, तसेच नागरिकांना अडचणीच्या वेळी मदत करणे आदी कामे केली जातात.
मागील दीड वर्षापासून सर्वत्र ग्रासलेल्या कोरना महामारीच्या काळात या संघटनेच्या मार्फत ग्रामीण भागातील रुग्णांना ऍम्ब्युलन्स मिळवून देणे, त्यांना धीर देणे योग्य ते मार्गदर्शन करणे अशा प्रकारची अनेक कामे करण्यात आली आहेत, तसेच कोरोनावाँरियर्स म्हणून काम करत असताना ज्या पोलिसाचा कोरोना मुळे मृत्यू झाला ,त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देणे कामी या संघटनेचा मोलाचा वाटा आहे .
या निवडीबद्दल विवेक पवार यांचे अभिनंदन करून आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य व युवक नेते रणजीत भैय्या शिंदे, सभापती विक्रम दादा शिंदे आदी मान्यवरांनी त्यांचा हृद्य सत्कार करून पुढील कार्यास सहकार्य व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे ,पंढरपूर तालुका अध्यक्ष नारायण मोहिते, पेहे गावचे माजी उपसरपंच सचिन पाटील, उद्योजक नानासाहेब बंडगर, युवक कार्यकर्ते सचिन मांजरे यांचे सह माढा व पंढरपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व विवेक पवार यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा