गारअकोले येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून एक पद एक वृक्ष या उपक्रमाचे सुरुवात
. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून या दिवसात वृक्षारोपण शक्यतो वाया जात नाही हरित वसुंधरा या संकल्पनेतून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात गावोगावी एक पद एक झाड ही संकल्पना राबवून जिल्हाभर जिल्हा परिषदेचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या माध्यमातून वृक्षारोपण अस चालना देण्यासाठी सदरचा उपक्रम सुरु केला असून या उपक्रमांतर्गत गारा अकोले ग्रामपंचायतीच्या व जिल्हा परिषद शाळा गार अकोले यांच्या वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेऊन वड. बेल, जांभूळ, निलगीरी. पिंपळ. अशोक . आवळा आपटा परीजाताक चिंच जीवनोपयोगी व आयुर्वेदिक वृक्षांची लागवड येथील ग्रामपंचायत ऑफिस व शाळा परिसरात करण्यात आली गाराअकोले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक समाधान सरडे यांच्या नियोजनाखाली गावचे सरपंच सौ सुलभा अशोक बिचकुले उपसरपंच गोविंद भाऊ पवार गाराअकोले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कदम गुरुजी त्यांचे सहकारी फुंदे गुरुजी महाडिक गुरुजी मस्के गुरुजी व अंगणवाडी सेविका सुनिता भोगले ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच बळीराम आन्ना केचे विजय केचे तुकाराम देवकते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार देवकते अशोक बिचकुले नवनाथ उर्फ दादासाहेब देवकते प्रकाश बिचकुले सुनील बिचकुले दत्तू नाना बिचकुले केशव देवकते अनिल पवार विजय केचे इत्यादी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळा परिसरात या वृक्षांची लागवड केली या वृक्ष लागवडीसाठी घेण्यात येणारे खड्डे गारअकोल्याचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांच्या सौजन्याने घेण्यात आले सदरच्या प्रसंगी गावचे ग्रामसेवक श्री समाधान सरडे म्हणाले की मुख्यकार्यकारी अधिकारी श्री स्वामी साहेबांचा हा संदेश फक्त मनात न आणता सर्व सदस्यांनी व गुरुजन वर्गांनी आज लावलेले वृक्षांची देखभाल व संगोपन करायचे आहे पुढील वर्षी या वृक्षांचा वाढदिवस साजरा करूनच गावातील महत्वाच्या ठिकाणी नवीन वृक्षाची लागवड करण्यात येईल व गारअकोले आणि परिसर वृक्षवेलींनी सुशोभित करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले गावचे उपसरपंच गोविंद भाऊ पवार यांनी गारअकोले तील सर्व शासकीय रस्ते शाळा परिसर ग्रामपंचायत परिसर अंगणवाडी परिसर व गावातील स्वामी महाराज मंदिर या परिसरात ही फळझाडांची व आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करून भावी काळात कोरूना सारख्या महामारी पासून आपला गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असा शब्द दिला ओके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा