Breaking

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अनुदान व बीजभांडवल,योजनेत अर्ज करण्याचे आवाहन


अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अनुदान व बीजभांडवल,
योजनेत अर्ज करण्याचे आवाह


उस्मानाबाद,दि.30   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी अनुदान योजना आणि  बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक त्र्यंबक रतनराव शिंदे यांनी केले आहे.

          जिल्ह्याकरिता 2021-2022 या वित्तिय वर्षासाठी अनुदान योजनेत भौतिक उद्दिष्ट 75 लाभार्थ्यांचे तर आर्थिक उद्दिष्ट 7 लाख 50 हजार रुपये आहे. बीजभांडवल योजनेअंतर्गत भौतिक उद्दिष्ट 30 लसभार्थ्यांचे आहे तर आर्थिक उद्दिष्ट 27 लाख रुपयांचे आहे.

          जिल्हा कार्यालयामार्फत अनुदान योजना आणि बीजभांडवल योजनेसाठी कर्ज मागणी,  अर्ज वितरण करणे तसेच अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु  आहे. मांग, मातंग , मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी , मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी आणि मादिगा या समाजातील इच्छुकांनी दूरध्वनी क्र. 02472-226602 वर संपर्क करावा किंवा  ई-मेल- sladsdcdmosmanabad@gmail.com वर संपर्क करता येईल.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मधील  महामंडळाचे जिल्हा कार्यालय येथेही प्रत्यक्ष संपर्क साधावा , असेही आवाहन श्री .शिंदे यांनी केले आहे.

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा