Breaking

शनिवार, ३१ जुलै, २०२१

वरुड येथे कृषिदूतांकडून माती परिक्षणाचे मार्गदर्शन वडूज



वरुड येथे कृषिदूतांकडून माती परिक्षणाचे मार्गदर्शन

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

          महात्मा फुले कृषीपिठ राहूरी संलग्न के व्ही पटेल कृषी महाविद्यालय, शहादा जिल्हा नंदूरबार येथील चतुर्थ वर्षातील कृषीदूत स्वप्नील अंकुश जाधव यांनी खटाव तालुक्यातील वरूड येथे सुरू असलेल्या ग्रामीण कृषी जागृरता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत वरूड येथे माती परिक्षण व सुयोग्य खतांच्या नियोजनावर प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. प्रात्यक्षिकामध्ये माती परिक्षण व परिक्षणाचे फायदे, खतांचा सुयोग्य वापर या बद्दल माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिका दरम्यान दत्तात्रय काटकर, सुरेश जाधव, बाळासो सुर्यवंशी, एकनाथ माळी, गौरव जाधव आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल पटेल व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा