*तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णांकृती पूतळा उभा करुन चौक सुशोभित करणे बाबत, तुळजापूर भीमसैनिकांचा वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन*
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पूतळा तुळजापूर शहरामध्ये उभा राहावा या गेले अनेक वर्षाच्या समाज बांधवाची मागणी आहे.
सदर काम तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गंत प्रस्थावित असून अद्यापर्यंत सदर कामास मंजूरी मिळाली नसल्याने पूर्णांकृती पूतळा उभा करण्यास विलंब होत आहे.
सदरील कामाचे मार्च महिन्यात तुळजापूर नगर परीषदने प्रस्ताव दाखल करूनही अध्याप मंजूरी मिळाली नाही.
तरी साहेबांनी या कामात लक्ष देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णांकृती पूतळा उभा करणे व सुशोभिकरण करणे कामास नवीन प्रस्ताव देवून मान्यता देण्यात यावी व प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी या मागणीचे निवेदन तुळजापूर भिमसैनिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सदर निवेदनात सागर कदम, लक्ष्मण कदम, सोमनाथ सोनवणे, किरण कदम, खंडू कदम, अनमोल शिंदे, अनिकेत सोनवणे, कमलेश कदम,कूणाल रोंगे, राहूल सोनवणे, योगेश सोनवणे, चेतन कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा