*वंचित आघाडीचा चा दणका खामसवाडी ता. कळंब येथील ग्रामविकास अधिकारी डी. एस . पटणे निलंबित*
उस्मानाबाद दि . 20 सविस्तर वृत्त असे की, ऐन पावसाळ्याच्या दिवसात दिनांक 13 जुलै 2021 रोजी अतिक्रमण हटाव मोहिम राबवून
खमसवाडी तालुका कळंब येथील 19 घरे जेसीबी ने उद्वस्त करून त्यांचे संसार उघडयावर पाडणाऱ्या ग्रामपंयात प्रशासना पासून ते गट विकास अधिकारी / नायब तहसीलदार / पोलीस अधिकारी /उप विभागीय अधिकारी या सर्व दोषींवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केल्या चा ठपका ठेऊन कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी . त्या बरोबर च पिडीत कुटुंबाच्या आसऱ्याची तातडीने सोय करावी या मागणी साठी लेखी निवेदन माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले होते .या मागणीला यश आले असून खामसवाडी तालुका कळंब येथील ग्राम विकास अधिकारी डी .एस . पटणे यांना गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे .त्याबरोबरच पिडीत कुटुंबांना पशुवैद्यकीय दवाखाना खामसवाडी या ठिकाणी राहण्याची तात्पुरती सोय करून देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा