महाराष्ट्र नवनिर्माण सेना टेंभुर्णी शहराध्यक्षपदी अनिल आरडे यांची निवड.
टेंभुर्णी प्रतिनिधी /महाराष्ट्र नवनिर्माण सेना टेंभुर्णी शहराध्यक्षपदी अनिल आरडे यांची निवड करण्यात आली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना टेंभुर्णी शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस शाडो सहकारमंत्री दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते टेंभुर्णी येथील मार्केट यार्ड येथे करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, उपाध्यक्ष बाळासाहेब टोणपे, माढा तालुकाध्यक्ष सागर लोकरे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, मोहनरावजी कांबळे, तालुका उपाध्यक्ष सागर बंदपट्टे, विधानसभा अध्यक्ष आकाश लांडे, कुर्डुवाडी शहराध्यक्ष ओंकार चौधरी, अमोल घोडके, महादेव पांढरे, युवराज कोळी, गणेश चौधरी, उमेश माने, सोमनाथ पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महेश जगताप, राहुल कांबळे, धनंजय जगताप, शाहरुख सय्यद, गोविंद खंडागळे, सचिन तांदळे, हारुण सय्यद, शेखर सुभाष कांबळे, गोविंद इंगळे, सोमनाथ पावसे, नागेश शिंदे, संदीप जगताप, सचिन ओहोळ, विकी जगताप आदीजण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा