जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने अकलूज येथील साखळी पद्धतीने बेमुदत उपोषणास श्री शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांना पत्र देऊन पाठिंबा
माळशिरस प्रतिनिधी स्नेहल थोरात
अकलूज ,माळेवाडी या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये व्हावे व नातेपुते ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतीमध्ये व्हावे या मागणीसाठी दिनांक 22 /6/ 2019 पासून या गावातील नागरिकांचे साखळी पद्धतीने उपोषण प्रांत कार्यालय अकलूज यांच्या कार्यालयासमोर चालू आहे त्या नागरिकांच्या हक्काच्या मागणीस जिजाऊ ब्रिगेड (सोलापूर- पंढरपूर विभाग ) माळशिरस तालुका यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पाठिंब्याचे पत्र अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय श्री शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांना जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकार्यांच्या हस्ते देण्यात आले
यावेळी सौ. मीनाक्षी अमोल जगदाळे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष, सौ मनोरमा दत्तात्रय लावंड माळशिरस तालुका अध्यक्ष ,सौ मनीषा संजय गायकवाड माळशिरस तालुका उपाध्यक्ष, पुनम सुसलादे सचिव, सौ शुभांगी शिरसागर अकलूज शहर अध्यक्ष ,सौ शारदा चव्हाण अकलूज शहर कार्याध्यक्ष, सौ कल्पना बापूराव चव्हाण संघटक ,सौ सुवर्णा संतोष क्षीरसागर संघटक, सौ आशा सावंत संघटक, सौ सुवर्णा भारत गोरवे ,सौ मनीषा जाधव ,सौ संगीता जगदाळे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या उपस्थित होत्या. तसेच वेगवेगळ्या पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा