केंद्राच्या विमा योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा- श्री. सावकार
टेंभुर्णी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक चे खातेदार सौ. सुषमा बिभीषण लोकरे यांचा दिनांक 25-10-2020 रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांनी केंद्र सरकारच्या "प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना " वार्षिक हफ्ता रूपये 330 व "प्रधानमंत्री सुरक्षा योजना "वार्षिक हफ्ता रूपये 12 या दोन्ही योजनेचा विमा उतरवला होता. या अंतर्गत त्यांचे वारस श्री. योगेश लोकरे यांना मिळणारे रुपये चार लाख पैकी रुपये दोन लाखाची विमा रक्कम टेंभुर्णी ग्रा. प. चे सरपंच श्री. प्रमोद कुटे व बँकेचे अधिकारी श्री. दिपक प्रकाश सावकार यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
यावेळी शाखेचे अधिकारी दिपक सावकार ,शाखेचे कर्मचारी सौ. दिपाली घाडगे, प्राची मोरे, मयुर आखाडे व ग्रापंचायत सदस्य श्री. शैलेश ओहोळ, श्री. गणेश केचे, डॉ. सोमनाथ साळुंके व लखन माने, प्रशांत देशमुख व इतर मान्यवर उस्थितीत होते.
विदर्भ कोकण ग्रामीण बँक च्या शेकडो खातेदारांनी या दोन्ही योजनेचा लाभ घेतला आहे.
सर्व खाते धारकांनी या विमा योजनां सह शासनाच्या "अटल पेन्शन योजने" चा हि लाभ घ्यावा असे आवाहन अधिकारी श्री. सावकार यांनी केले. या पेन्शन योजने नुसार वय वर्ष 60 नंतर रुपये एक हजार ते रुपये पाच हजार पर्यंत पेन्शन मिळते. यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत किंवा बँक मित्र व बँक सखी यांचेकडे अर्ज करता येतो.
यावेळी लाभार्थी श्री. लोकरे यांनी शाखा व्यवस्थापक श्री. राधेश्याम नोगजा साहेब, सोलापूर विभागीय कार्यालयातील श्री. सतिश मेहता साहेब यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा