महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे अभिजित पंतगे यांच्या आमरण उपोषणला जाहीर पाठिंबा देऊन ,मा.मुख्याधिकारी साहेब नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले.
जिजाऊ चौक(बार्शी नाका)ते बोंबले हनुमान चौक या रस्त्याची बर्याच वर्षांपासून दुरावस्था झाल्यामुळे त्या भागातील राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे असल्याने श्री.अभिजित नारायण पंतगे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 27/07/2021रोजी पासून नगर परिषद प्रशासना विरुद्ध आमरण उपोषण चालू केले आहे. सदरील रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून उपोषणकर्ता व नागरिकांना योग्य तो न्याय द्यावा.
तरी सदरील उपोषणकर्त्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपालिका उस्मानाबाद येथे मनसे स्टाईल आंदोलन करेल, आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील याची दखल घ्यावी असे निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी साहेबांना देण्यात आले.
यावेळी राहुल विलासराव बचाटे (सर)जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना, कुणाल महाजन जिल्हाध्यक्ष मनविसे, निलेश जाधव शहराध्यक्ष मनविसे, आदित्य लगदिवे जिल्हा सचिव मनविसे, धीरज खोत,दिपक पवार, ओंकार गुळवे, प्रदीप चौगुले, सोमनाथ जाधव, अविनाश चौगुले आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा