जनशक्ती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी शारदा भस्मे
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
महाराष्ट्र राज्य शासनमान्यता प्राप्त असलेल्या जनशक्ती संघटनेच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी वडूज कर्मवीर नगर ता. खटाव येथील शारदा संजय भस्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील, सांगली जिल्हा संघटक गोरख व्हनकडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मिरज तालुकाप्रमुख अजित कांबळे, खोतवाडी शहराध्यक्ष सारंग कांबळे, मालगाव शहराध्यक्ष शशिकांत व्हनकळस, कुपवाड शहरध्यक्षा सीमा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भस्मे म्हणाल्या की, संघटनेच्या माध्यमातुन आपण बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, प्रत्येक समाजातील गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असुन जनशक्ती संघटनेचे धेयधोरण तळागाळातील लोकांसाठी राबवून सामाजिक कार्य करणार आहे. या निवडीबद्दल वडूज परिसरारातून भस्मे यांचे अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा