किनवट तालुक्यातील शिवणी व दयाल धानोरा येथे बुधवार सायंकाळी अचानक वादळ सह विजेच्या कडकडात पाऊस चालू झाला होता त्यात शिवणी येथील शेतकरी गंगाधर अबय्या येईलवाड वय ४५ असून या इसमाचा काल बुधवार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतात विज पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शिवणी शिवारात घडली.तर दयाल धानोरा येथील कमलीबाई मांगीलाल जाधव वय ५५ ही महिला शेतात काम करत असताना वीज पडून जखमी झाली.
किनवट तालुक्यातील शिवणी येथे दि.७ जुलै बुधवार रोजी इस्लापुर व शिवणी भागात दुपार पासूनच आभाळ होते.सायंकाळी ४ ते ५ वाजनाच्या सुमारास अचानक वारा वादळ व मेघ गर्जनेसह पाऊस झाल्याने गंगाधर अबय्या येईलवाड हा इसम शेतीमध्ये सोयाबीन पिकाला फवारणी च्या कामात व्यस्थ असताना अचानक वीज अंगावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अंगावर वीज पडून इसमाचे शेतातील मध्यभागी जागीच मृत्यू झाल्याची ही घटना शिवणी गावात समजताच गावातील नागरिकांनी घटने स्थळी धाव घेऊन पाहण्यासाठी गर्दी केली होती.सदर घटनेची माहिती इस्लापुर पोलीस स्टेशन येथे कळविले असून सपोनि डेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश बोधगिरे पो उपनिरीक्षक अंकुश लुंगारे पोलीस अमलदार सावळे सह कर्मचारी तातडीने घटना स्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शिवणी येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले या घटनेचे इस्लापुर येथे आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली.तर दुसऱ्या दिवशी दि.जुलै रोजी शवविच्छेदन करण्यात आले.मृत व्यक्ती गंगाधर यवलवाड हे परिवारातील एकमेव कुटुंब प्रमुख होते.मागील अनेक वर्षांपासून ते शेतातील सालगडी म्हणून काम करत होते. अचानक वीज पडून ते दगावल्याने त्यांच्या कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.या दुर्देवी घटनेचे इस्लापुर व शिवणी परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.तर दयाल धानोरा येथील कमलीबाई मांगीलाल जाधव वय ५५ ही महिला शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून जखमी झाली असून या महिलेला प्रा.आरोग्य केंद्र शिवणी येथे उपचार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा