सुटा संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. नेताजी कोकाटे यांची निवड
टेंभुर्णी: येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. नेताजी भारत कोकाटे यांची सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या (सुटा) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी सुटा संघटनेचे उपाध्यक्ष पद भूषवले आहे. या काळात त्यांनी प्राध्यापकांच्या अनेक प्रश्नाना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कामाची पोच म्हणून संघटनेने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे.ही निवड दोन वर्षासाठी आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या निवडीबद्दल डॉ. कोकाटे यांचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदे, श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा