हौसा शॉर्ट फिल्म अभिनेत्री जयश्री बिरलिंगे चा येरळा परिवाराकडून सत्कार
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
लाल दिवा प्रॉडक्शन निर्मित व ओंकार गाडेकर - पाटील दिगदर्शित हौसा या शॉर्ट फिल्मच्या प्रमुख भूमिका असलेल्या मुख्य नायिका आणि झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका कारभारी लय भारी व नव्याने सुरू होणाऱ्या मन झालं बाजिंद मधील सहाय्यक अभिनेत्री जयश्री बिरलिंगे या वडूज ता खटाव येथील येरळा परिवार संस्थेला भेट देण्याकरिता आल्या असत्या त्यांचा खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीने खटाव पंचायत समितीचे माजी सभापती व येरळा परिवार सदस्य संदीपदादा मांडवे, शरद कदम यांच्या हस्ते येरळा दौलत विशेषांक, येरळा दर्शनचा अंक भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कोरोना काळातील पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोरोना योध्दा पुरस्कार मिळाल्याबद्दल येरळा दर्शनचे उपसंपादक शरद कदम यांचा तर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या समाजसेविका शारदा भस्मे यांचा ही सत्कार अभिनेत्री जयश्री बिरलींगे व माजी सभापती संदिपदादा मांडवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना अभिनेत्री जयश्री बिरलींगे म्हणाल्या की, समाजातील जडणघडणीत आणि तळागाळातील काम केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहित करून पुढील कार्यास बळ देणे, समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांच्या पुढील कामासाठी मार्ग दाखविण्याचा हा येरळा परिवारांचा उपक्रम खटाव तालुका सोशल फांऊडेशनच्या माध्यमातून सुरू असलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून येरळा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष धनंजय क्षीरसागर व सर्व टीमचे त्यांनी आभार मानले.
यावेळी वडूज मेडिकल असोशियनचे अध्यक्ष डॉ.संतोष देशमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले, असंघटीत कामगार महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षा शारदा भस्मे, माळशिरस तालुकाध्यक्षा जयश्री मोहिते, गुरसाळेचे उपसरपंच अॅड - रोहन जाधव, ऊंबर्डेचे उपसरपंच संभाजी पवार, भोसरेचे माजी सरपंच नितीन जाधव, लोणीचे युवा नेते ज्ञानेश्वर शिंदे, अंबवडेचे ज्ञानेश्वर इंगवले, धनाजी चव्हाण, तुकाराम खाडे, गणपत खाडे, रणजीत फडतरे, पै.अक्षय मांडवे, शिवाजीराव पवार, सचिन साठे आदिसह येरळा परिवार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे के काळे यांनी केले तर आभार सोमनाथ साठे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा