Breaking

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

कटगुणच्या सुजाता कदम यांचा बीज राखी रक्षाबंधन



कटगुणच्या सुजाता कदम यांचा बीज राखी रक्षाबंधन

वडूज प्रतिनिधी / शरद कदम

       कटगुण ता. खटाव येथील सुजाता कदम यांनी राखी पोर्णिमेनिमित्त पुसेगाव पोलीस स्टेशन येथे सानिका एज्युकेशन संस्थेच्या वतीने बीज राखी उपक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाला पुसेगाव पोलिस स्टेशनचे पीएसआय बाळासाहेब लोंढे, सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय बेंबले, पोलीस नाईक रेश्मा भोसले, आनंदराव जगताप, विजय खाडे, पूनम जगदाळे, निकिता कुंभार, चंद्रकांत खाडे आदि सह पोलीस बांधव उपस्थित होते. उपस्थित सर्व पोलीस बांधवाना बीज राखी बांधण्यात आल्या. 
        यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुजाता कदम यांनी जो रक्षण करतो तो भाऊ हि संकल्पना मनात घेऊन कडधान्यापासून बीज राख्या तयार करून कोरोना काळामध्ये जनतेचे रक्षण करण्याचे खूप मोठी भूमिका पोलीस यंत्रणा पार पाडत आहे. एकप्रकारे भाऊ बहिणीचे नाते निभावित आहेत. कोरोनाच्या काळात कोरोना योध्दा म्हणून सर्व पोलीस बांधवांना बीज राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सुजाता कदम यांचा महत्त्वाचा उद्देश असा होता की, बीज राखी कुंडीत किंवा अंगणात रुजवावी आणि त्यापासून उगविणाऱ्या रोपांच्या स्वरूपात बहिणीची आठवण भावाच्या मनात काही स्वरूपी असावी.
          बीज राखी बांधल्यावर लोंढेसाहेब म्हणाले की, सुजाता कदम यांनी राबविलेला बीज राखी हा उपक्रम प्रेरणादायी असून आशा प्रकारे उपक्रम समाजात राबविणे गरजेचे आहे. या वेळी सारीका चव्हाण, रूपाली निकम, विद्या शेडगे, श्वेता चव्हाण आदि सह सानिका संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा