Breaking

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

टेंभुर्णी ग्रामपंचायतीला विविध विकास कामा साठी भाजपच्या वतीने दिले निवेदन



 टेंभुर्णी ग्रामपंचायतीला विविध विकास कामा साठी  भाजपच्या वतीने दिले निवेदन




टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी येथील वार्ड क्रमांक चार मधील ओढ्याचे खोलीकरण व्हावे. तसेच राहिलेल्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व भुयारी गटाराचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विजय कोकाटे यांनी टेंभुर्णी ग्रामपंचायतीस निवेदन दिले.
यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंदलकर,भाजयुमो शहराध्यक्ष आकाश देशमुख,नाभिक संघटनेचे अध्यक्ष योगेश साळुंखे,लक्ष्मण पाचंगे,कैलास आतकर,प्रशांत इंगळे,लखन माने,मोहन पोळ,महेश अवसलकर तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा