Breaking

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

बळीराजा फिल्म प्रोडक्शन त्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न


 बळीराजा फिल्म प्रोडक्शन त्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न



टेंभुर्णी प्रतिनिधी 

बळीराजा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट चाटाळवाडी या युट्युब वेब सिरीज चे अल्पावधीतच 5000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालयामध्ये या वेब सिरीज चा यशस्वी वाटचाल सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर,ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे,सोमनाथ साळुंके,शैलेश ओव्होळ,युवा उद्योजक सुरेश देशमुख,गोरख देशमुख,शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे ,प्रशांत देशमुख,विजय देशमुख,लखन माने,युवराज वजाळे,पोलीस कॉन्स्टेबल तळेकर व राऊत यांच्यासह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मुक्काम पोस्ट चाटाळवाडी लेखन व दिग्दर्शन अब्दुल मुलाणी तर निर्माता म्हणून सादिक मुलाणी हे काम पाहत आहेत यात राधा साळुंके,महादेव आरगडे,विठ्ठल साळुंके,योगीराज पाटील,आरोही कुलकर्णी,पैगंबर मुलाणी,रामभाऊ पवार,स्वाती अधटराव,अण्णासाहेब इंदलकर,सोमा पावशे,नाथा सावंत,संदीप देशमुख कुमार थोरात,तुकाराम दरगुडे,दिनेश लोंढे,करण कांबळे रबुभाई शेख. मौलाली मुलाणी, उस्मान मदारी योगेश साळुंखे गणेश राऊत अविनाश इंदलकर इत्यादी कलाकार काम करतात या वेब सिरीज या वेब सिरीजचे छायांकन संकलन सरदार मुलाणी हे करतात तर टायटल सॉंगचे गायन टेंभुर्णी येथील प्रसिद्ध गायक अण्णासाहेब इंदलकर यांनी केले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पैगंबर मुलाणी यांनी केले तर सूत्रसंचालन नाथा सावंत यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी लेखक-दिग्दर्शक अब्दुल मुलांणी यांनी आभार व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा