*टेंभुर्णी येथिल शिवराज ढगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध संघटनेच्या वतीने सत्कार*
दौंड तालुक्यातील वरवंड ग्राम शिक्षण संस्थेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त सत्कार सोहळ्या साजरा करण्यात आला यामध्ये
टेंभुर्णी येथील शिवराज सोपान ढगे यांना दौंड तालुक्यातील वरवंड ग्राम शिक्षण संस्था यांच्या मार्फत दिला जाणारा कर्मयोगी एकनाथ सीताराम दिवेकर स्मृती पुरस्कार, वरवंड येथील कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे , बारामती येथील टी. सी. कॉलेजचे प्राचार्य सी. ए. मुरूमकर तसेच वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय अण्णा दिवेकर व विश्वस्त डॅा. विजयकुमार दिवेकर, सदस्य अंकुश भाऊ दिवेकर, सौ. योगिनीताई दिवेकर, औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या प्राचार्या अमिता डोंगरे, आर्ट्स, कॉमर्स विभागाचे प्राचार्य एल. के. शितोळे उपप्राचार्य ए.व्ही. शितोळे हस्ते प्रदान करण्यात आला.
शिवराज सोपान ढगे हे मूळचे टेंभुर्णी तालुका माढा येथील दैनिक सामना या वृत्तपत्राचे प्रतिनीधी सोपान गंगाधर ढगे यांचे कनिष्ठ चिरंजीव असून शिवराज ढगे हे सध्या दौड तालुक्यातील वरवंड येथिल एकनाथ सीताराम दिवेकर कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी ह्युमन ॲनाटोमी अँड फिजिओलॉजी व फार्माकोलॉजी अँड टॉक्सीकोलॉजी या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. नुकतेच त्यांचे इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च अँड एनालाइटिकल रिव्ह्यू या प्रसिद्ध जनरल मध्ये पलस्टाईल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता त्याच बरोबर इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्माकोग्नोसी अँड लाइफ सायन्स जर्नलमध्ये नॅचरल मुसीलेज अँड ससपेंडीग एजंट हा शोधनिबंध झाला होता. शोधनिबंध साठी तसेच त्यांनी व सहकार्यांनी लिहिलेल्या कनसाईज फार्मसी या पुस्तकासाठी संशोधन-ग्रंथ लेखनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या बरोबरच त्यांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची शैली अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
डाॅ. विजयकुमार दिवेकर , सौ. योगिनीताई दिवेकर आणि औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या प्राचार्या अमिता डोंगरे यांच्या मार्गदर्शनखाली अनेक सामाजिक कार्य केल्याबद्दल प्रा. शिवराज ढगे, प्रा. ममता दिवेकर, प्रा. रोहित खराडे, प्रा. पूजा कटके, प्रा. पुनम थोरात, प्रा. अनुजा मलगुंडे या सर्व जणांना बेस्ट परफॉर्मर टीम ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर टेंभुर्णी व वरवंड भागातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. शिवसेना तालुकाप्रमुख अण्णा देशमुख, तसेच भाजपाचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, टेंभुर्णी शहराध्यक्ष नागनाथ वाघे, टेंभुर्णी शहर आध्यक्ष सुरेश लोंढे रि.पाई चे जयवंत पोळ परमेश्वर खरात
टेभुर्णी प्रेस क्लबचे आध्यक्ष संतोष पाटील उपाध्यक्ष सतिश काळे सचिव सचिन होदाडे जेष्ठ पत्रकार डी.एस .गायकवाड ,सदाशिव पवार, सुहास साळुंखे विष्णू बिचुकले,अनिल जगताप, गणेश चौगुले ,सुरज देशमुख, सतिश चांदगुडे , सुरजीत रघुनाथ बनसोडे यांनी पुष्पहार शाल श्रीफळ देवुन प्रा. शिवराज ढगे यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा