Breaking

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

चिपळूण येथील पूरग्रस्तांना फलटकरांचा मदतीचा हात.

चिपळूण येथील पूरग्रस्तांना फलटकरांचा मदतीचा हात.

 फलटण(प्रतिनिधी)- देशात किंवा राज्यात कधीही नैसर्गिक संकट आले तर मदतीसाठी फलटणकर अग्रभागी असतात हा इतिहास असून चिपळूण येथील पुरग्रस्तांसाठी फलटणकरांनी केलेली मदत अनमोल असल्याचे गौरवोद्गार प्रांताधिकारी डॉ श्री.शिवाजीराव जगताप यांनी काढले.
आम्ही फलटणकरतर्फे  चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली  असून सदरची मदतीसाठी फलटणकरांनी मोठा हातभार लावला आहे.ही भरीव मदत  चिपळूनकडे रवाना करताना प्रांताधिकारी डॉक्टर श्री.शिवाजीराव जगताप बोलत होते.
यावेळी राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.मिलिंद नेवसे, नगरसेवक मा. अशोकराव जाधव,सचिन अहिवळे ,भाजपचे शहराध्यक्ष अमोल सस्ते,काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख,नसीर शिकलगार, सदाशिवराव जगदाळे, राजाभाऊ नागटिळे,प्रसन्न रुद्रभटे, शंकरराव मुळीक, राहुल शहा, धनराज कदम ,तात्या गायकवाड,अभिजित भोसले(हॉटेल ब्रम्हा),इम्तियाज तांबोळी,उद्धव बोराटे,अल्ताप पठाण,नितीन जगताप,श्रीकांत पालकर हे उपस्थित होते.
फलटण मधील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चिपळूण येथील पुरग्रस्तांसाठी मदतीची हाक देताच मोठ्या प्रमाणात अल्पावधीतच मदत गोळा झाली यावरूनच फलटण वासीयांची मदतीची भावना दिसून आली. गोळा झालेली मदत गरजवतांना निश्चितच पोहचेल असा विश्वास प्रांताधिकारी डॉ श्री.शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केली.
कु. देवयानी अमोल सस्ते हिच्या वाढदिवसाचा खर्च न करता त्या रकमेचे ब्लॅंकेट चिपळूण येथील पूरग्रस्त भागातील लोकांसाठी यावेळी देण्यात आली याप्रसंगी तिचा सत्कार नगरसेवक मा.अशोकराव जाधव यांचे हस्ते करणेत आला.
यावेळी नगरपालिकेतील निवृत्त अधिकारी मा.सदाशिवराव जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रांताधिकारी डॉ श्री. शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा