Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

मुधोजी हायस्कुलची माजी विद्यार्थी संघटना उभारावी.श्रीमंत.रामराजे नाईक निंबाळकर.*


*मुधोजी हायस्कुलची माजी विद्यार्थी संघटना उभारावी.श्रीमंत.रामराजे नाईक निंबाळकर.*




फलटण(प्रतिनिधी)- शरीफ काझी यास कडून

 फलटण एज्युकेशन सोसायटी आणि मुधोजी हायस्कुल यांचे शिक्षण प्रसाराचे कार्य शंभर पेक्षा अधिक वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे. मुधोजी हायस्कूलच्या 1990 तुकडीच्या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्यातून सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेची उभारणी करावी अशा संस्थात्मक कार्य उभारणीतून नव्या पिढीचे भविष्य घडविले जावे, संकटग्रस्ताचे अश्रू पुसले जावेत आणि गरजवंताना दिलासा देण्यासाठी कार्यरत रहावे, अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केली.




  विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते फलटण येथील मुधोजी हायस्कुलच्या 1990 सालच्या इयत्ता 10 वी तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात उच्चापदावर पोहचवलेल्या सह–अध्यायींचा सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी सत्कारमूर्ती आणि उपस्थितांना संबोधित करताना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

विधान भवनातील, मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कौटुंबिक परंतु आगळ्यावेगळ्या समारंभामुळे उपस्थित फलटणकरांसह सर्वांच्याच मनात आनंदाचा ठेवा बनून राहिलेल्या शालेय जीवनातील स्मृर्तीना उजाळा मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ. सुजाता खाडे - ढोले, मुंबई उच्च न्यायालयात वकीलीची 23 वर्षे पूर्ण केलेले ॲड. विश्वनाथ टाळकुटे, तसेच श्रीमती विजया गाडे – सांगळे यांचे सुपुत्र आणि भारतातील पहिला विगन टेनिसपटू विश्वजित सांगळे यांचा “स्नेहदर्पन” पुरस्कार देऊन आगळा वेगळा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्तीना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, मीरा - भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, निवृत्त सह सचिव भाई मयेकर, माऊली फाऊंडेशन काळबादेवीचे अध्यक्ष डॉ. सिंगन,राष्ट्वादी काँग्रेसचे प्रदेश संघटक मोहन भोसले, विधान परिषद सभापती यांचे सचिव महेंद्र काज, रुईया कॉलेजचे प्राध्यापक चंद्रशेखर नेने प्रसन्न रुद्रभटे, बाळासाहेब ननावरे,किरण बोळे समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभामुळे समाजकार्यातआणखी मोठे योगदान देण्याची प्ररेणा आणि बळ आम्हांला प्राप्त झाले अशी भावना सत्कारमूर्तीनी ये वेळी व्यक्त केली.
   या कार्यक्रमास  वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्रचे संचालक निलेश मदाने, विधान परिषद सभापती यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय खानोलकर यांच्यासह मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी विद्यार्थी त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 प्रास्ताविक नसीर शिकलगार यांनी सूत्रसंचालन सौ. दीपाली  निंबाळकर, गौरवपत्राचे वाचन सौ शितल साळे आणि आभार प्रदर्शन श्रीमती श्रध्दा सांगळे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा