*सोलापूरात भटके विमुक्तांचा निर्धार मेळाव्याचे आयोजन, आमदार राजेश राठोड यांची तुळजापूर येथे पत्रकार परिषदेत माहिती*
तुळजापूर दि.२८, भटके विमुक्त समाजाचा सोलापूर येथे दिनांक ३१/८/२०२१ रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, असून सदर मेळाव्याची माहिती देण्यासंदर्भात तुळजापूर सर्किट हाऊस येथे (दि.२८) रोजी आमदर राजेश राठोड यांचे मार्गदर्शन खाली पत्रकार परिषद पार पडली.यावेळी पुढे आमदर.राठोड यानी माहिती दिली.ते म्हणाले की ओबीसीची जात गणना, करावी,ओबीसी विध्यार्थी ना शिष्यवृत्ती द्यावी,नोकरीत पदोन्नती द्यावी,एससी प्रमाणे भुमिहीन ओबीसींना जमिनी वाटप कराव्या,ओबीसींना मुख्य प्रवाहात आनावे ह्या इतर मागण्या मेळाव्यात करण्यात येणार असल्याते म्हणाले.यावेळी आमदार राजेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, शिवसेना नेते गुलाब जाधव, हरीश जाधव वैभव जाधव, सुरेश चव्हाण, शेषराव चव्हाण, उत्तम चव्हाण, अविनाश चव्हाण,राजू चव्हाण, कुमार राठोड,अशोक जाधव, दत्ता मस्के, साहेबराव जाधव,ओबीसीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा