Breaking

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

अकोले खुर्द येथील श्री गणपती फार्मसीमध्ये विनाशुल्क अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध*



*श्री गणपती फार्मसीमध्ये विनाशुल्क अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध*
अकोले खुर्द, टेंभुर्णी, ता. माढा
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या बारावी सायन्स नंतरच्या डी.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या  तारखा जाहीर झाल्या असून शनिवार, दि १० जुलै २०२१ पासून ते सुरवातीला ०२ ऑगस्ट नंतर दि. १० ऑगस्ट २०२१ नंतर २० ऑगस्ट अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत होते पण या दिलेल्या मुदतीत बऱ्याच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे व संबंधित बाबींची पूर्तता होऊ शकली नाही त्यामुळे आता डी. फार्मसी प्रवेशाच्या रजिस्ट्रेशनची मुदत पुन्हा वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता दि.२७ ऑगस्ट २०२१ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे.’ अशी माहिती डीटीई च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. श्री गणपती फार्मसी, अकोले खुर्द, तालुका- माढा येथे विनाशुल्क अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करन्यात आलेची माहिती संस्थेचे सचिव प्रा. डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी दिली.
         या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेनंतर गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर दिनांक  30 ऑगस्ट 2021 रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.  गुणवत्ता यादी मध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दि.31 ऑगस्ट 2021 ते 2 सप्टेंबर 2021 या दरम्यान करता येईल. यानंतर दि. 4 सप्टेंबर 20121 रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांकडे आपल्या प्रवर्गानुसार योग्य ती  कागदपत्रे असणे आवश्यक आहे.  डी.फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे आणि अगोदर दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केलेले नाही असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा