सावरगाव येथील जि .प . प्रशाला येथील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जि. प. प्रशालेच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. दीक्षा तानाजी कदम, द्वितीय क्रमांक सुहासिनी सुरेश डोके, तृतीय क्रमांक निकिता पोपट गाबणे, तसेच ध्रुवीता प्रशांत बावळे, साक्षी शिवप्रसाद सोंजी, स्नेहल सुधीर मगर , वसुधा विकास ढेकणे, ऐश्वर्या गणपत डोके आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जि प प्रशाला येथील राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये एका विद्यार्थ्याने यश मिळवले आहे. प्रशालेतील तेरा विद्यार्थ्यांनी या परिषदेमध्ये सहभाग नोंदवला होता त्यापैकी डोके गायत्री सुरेश हिने प्रशालेतुन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे, यानिमित्त शिष्यवृत्तीधारक डोके यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी जिप सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर(आबा)तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, शा व्य स अध्यक्ष रामराजे पाटील ,माजी पस सभापती विलास डोलारे, निबंधक पोपट माळी, रंगनाथ डोलारे, तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी ,विद्यार्थी ,पालक आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा