*प्रदीपराव पाटील यांना मराठा सेवा संघाचा विशेष सन्मान गौरव पुरस्कार प्रदान*
टेंभूर्णी प्रतिनिधी
उजनी ता. माढा येथील मराठा सेवा संघाचे सोलापूर जिल्हा संघटक प्रदीपराव पाटील यांना इंदापूर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने 31 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून इंदापूर तालुका जिल्हा पुणे मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड इंदापूर यांच्या वतीने प्रदीपराव पाटील यांनी केलेल्या लोकहिताच्या सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंदापूर तालुक्याच्या वतीने विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
हा पुरस्कार जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने,जिल्हा परिषद सदस्या अंकिताताई पाटील, इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता ताई शहा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष जीवन निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राहुल घोगरे,इंदापूर शहराध्यक्ष राहुल गुंडेकर,गणेश रणदिवे,जयश्रीताई गटकुळ गटनेते कैलास कदम यांनी केले होते.
यावेळी उपस्थित इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस धनंजय तांबिले व मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
चौकट
सोलापूर जिल्ह्यातून एकमेव प्रदीपराव पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील,सोलापूर जिल्ह्या मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब पाटील,माढा तालुका अध्यक्ष निलेश देशमुख,संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप व जिजाऊ ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा सुरजाताई बोबडे तसेच माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर माढा तालुका विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांनी प्रदीपराव पाटील यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा