खटाव येथे जागतिक आदिवासी दिन साजरा
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खटाव ता. खटाव येथील गोळे वस्ती येथे खटाव परिसरातील पारधी समाजाच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. पारधी समाजाचे क्रांतीकारक समशेरसिंह भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारधी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अब्दूल शिंदे, महाराष्ट्र राज्य आदिवासी महिला आघाडीच्या अध्यक्षा राणी शिंदे, औंध ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजाभाऊ देशमुख, खटावचे युवा नेतृत्व प्रतिक विधाते, पत्रकार शरदराव कदम, काश्मिर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आदिवासी दिनाच्या निमित्ताने पारधी समाजातील युवक -युवतीना प्रोत्साहनपर इतर समाजाबरोबर चालण्याकरिता एमपीसी, युपीसी अभ्यासक्रमाची पुस्तके काश्मिर शिंदे यांच्या वतीने भेट देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून पारधी समाजाला संबोधित केले. कार्यक्रमास औंध ज्युनियर कॉलेजचे विशाल देशमुख, शफिक मुल्ला, गजानन इंगळे, प्रियंका शिंदे, शिल्पा काळे, अमीशा पवार, उज्वला शिंदे, सनम शिंदे, मतन शिंदे, किरण शिंदे, अतिश भोसले, अशोक शिंदे आदिसह पारधी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत नाना भोसले यांनी केले तर आभार अक्षय भोसले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा