पिंपळनेरच्या आर्या स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपळनेर ता.माढा येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी प्राचार्य रवींद्र लोखंडे, डॉ.हर्षल शहा व इतर मान्यवर.
सीबीएसई बोर्डाचे १० वीचे व राज्य बोर्डाच्या १२ वी मधील विद्यार्थ्यांचा समावेश
माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव (टें) संचलित,आर्या पब्लिक स्कूल पिंपळनेर या सीबीएसई बोर्डाचा १० वीचा व आर्या ज्युनिअर कॉलेज या राज्य बोर्डाचा १२ वी विज्ञान शाखेचा यावर्षीचा निकाल १०० टक्के लागला असून स्कूलमधील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य रवींद्र लोखंडे,प्रमुख पाहुणे डॉ.हर्षल शहा,मुख्याध्यापक सचिन पवार व प्रसन्न शहा यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी करण्यात आला.
या सत्कारमूर्ती गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये १० वीमध्ये प्रथम क्रमांक ऋषभ शहा ९६.६० टक्के,द्वितीय क्रमांक प्राजक्ता नवगिरे ९५.२० टक्के तर तृतीय क्रमांक रिसा शहा ९४.८० टक्के तसेच इयत्ता 12 वीमध्ये प्रथम क्रमांक आर्या रणजितसिंह शिंदे ९८.६६ टक्के, द्वितीय क्रमांक तेजस कुलकर्णी ८८.०५ टक्के,तृतीय क्रमांक पल्लवी पाटील ८७.६६ टक्के यांचा समावेश आहे.
सत्काराला उत्तर देताना आर्या शिंदे हिने सांगितले की,या स्कूलमधील शिक्षकांच्या अचूक व योग्य मार्गदर्शनामुळे हे उल्लेखनीय यश मिळाले आहे.कोणत्याही विद्यार्थ्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यास व कठोर परिश्रम केल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येऊ शकते असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.हर्षल शहा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यात मोठे अधिकारी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा बहुमोल सल्ला दिला आणि स्कूलमधील शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले.
सूत्रसंचालन दादासाहेब अधटराव यांनी केले.आभार स्वप्निल झांबरे यांनी मानले.यावेळी राहुल सोमासे,हर्षल शिंदे,अनंतकुमार साठे,स्मिता पाटील,शोएब शेख,कुमार बडे,योगेश जाधव,सतिश वरपे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा