Breaking

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर्स आरोग्य अधिकाऱ्यांनी सोडली वा-यावर...* *डॉक्टर्ससह सर्व शेकडो स्टाफला तिस-या लाटेच्या तोंडावर दिले कार्यमुक्तीचे आदेश...* *पगारावाचून सर्वांचेच हाल... पेशंट दगावला तर जबाबदार कोण?* *नवीन आदेश न निघण्याचे गौडबंगाल काय?**✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️**अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*

सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर्स आरोग्य अधिकाऱ्यांनी सोडली वा-यावर...*
     *डॉक्टर्ससह सर्व शेकडो स्टाफला तिस-या लाटेच्या तोंडावर दिले कार्यमुक्तीचे आदेश...*
     *पगारावाचून सर्वांचेच हाल... पेशंट दगावला तर जबाबदार कोण?*
   *नवीन आदेश न निघण्याचे गौडबंगाल काय?*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*



       *संपूर्ण सोलापूर जिल्ह्यांत गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनोच्या तिस-या लाटेला सुरूवात झाली असून गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील ११ तालुक्यातील सर्व कोविड सेंटर्स मधील २६४ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.*
     *सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन शासकीय कोविड सेंटर्स आहेत.तेथे गेल्या सव्वा वर्षांपासून डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन,वाॅर्डबाॅय,सफाई कामगार जिवाचं रान करून रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.*
     *त्यामध्ये २८ डॉक्टर्स, १४९ नर्सेस, टेक्निशियन,वाॅर्डबाॅय आदी ८७ स्टाफ पगारी वेळच्या वेळी न मिळूनही,सॅनिटायझर,मास्क, हातमोजे तसेच त्यांना कोणत्याही सुविधा न मिळताही या सर्वांनी इमानेइतबारे आपली कार्य निस्पृह भावनेने बजावते.*
     *या सर्वांना २ जुलै पासून कार्यमुक्त करण्याचें लेखी आदेश जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिल्याने जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर्स सध्या वा-यावर सोडण्यात आली आहेत.विशेष म्हणजे हे आदेश १३ जुलैला काढले अन् अंमलबजावणीला आॅगष्ट महिना उलटला असा कोविडच्या तात्काळ सेवेची त-हा.गेला महिनाभर सर्व कर्मचाऱ्यांना फुकट राबविण्यात आले आहे.*
       *अधिक माहिती विचारली असता दोन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगारीच न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.*
    *एवढेच नव्हे तर सर्वजण पदरखर्चाने सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत.*
        *या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित कामावर रहाण्याचे का आदेश देण्यात आले नाहीत?याचेही फार मोठे गौडबंगालच आहे.*
       *याबाबत राज्य आरोग्य यंत्रणेला संपर्क साधला असता सांगली, सातारा, कोल्हापूर,ठाणे, पुणे, नगर,नाशीक आदी अनेक जिल्ह्यांत सदरहू कोविड सेंटर्स मधील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचें आदेश त्या त्या जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी काढले असल्याचे सांगितले.*
      *एवढेच नव्हे तर काही जिल्ह्यांनी अतिरिक्त नवीन भरतीचेही आदेश दिले आहेत.*
     *सध्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली असून ११ जिल्ह्यांपैकी माढा, पंढरपूर, सांगोला व माळशिरस येथे सर्वाधिक सरासरी ७८ ते ८० टक्के रुग्ण आहेत.*
     *जिल्ह्यातील सर्वच कोविड सेंटर्समध्ये ना पगारी,ना सुविधा ना अधिकृत कायदेशीर अधिकार अशा अवस्थेत संपूर्ण जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून बेभरवशी व बिन पगारी पूर्णाधिकारी असा कारभार सुरू असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.*
    *अशात एखाद्या रुग्णाचे कमी अधिक झाले तर त्याला जबाबदार कोण?असा रास्त प्रश्न उभा ठाकला आहे.*
    *अशी जिल्हाभर अवस्था आरोग्य अधिकाऱ्यांची व कर्मचारी यांची आहे तर रुग्णांची अवस्थाही मुकी जनावरे कुणीही हाका...अशी झाली आहे.*
   *जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यांचे गांभीर्य ओळखून कोविड सेंटर्स मधील कर्मचाऱ्यांना नियमित नियुक्तीचे आदेश देऊन सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात अशी जिल्हाभर सर्व स्तरातून मागणी होत आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा