Breaking

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

रासेयो स्वयंसेवक विक्रम राठोड याचे कोरोना काळातील कार्य स्तुत्य - उल्हासदादा बोरगावकर



रासेयो स्वयंसेवक विक्रम राठोड याचे कोरोना काळातील कार्य स्तुत्य - उल्हासदादा बोरगावकर

तुळजापूर दि १४ 

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक  विक्रम माणिक राठोड यांस उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठ रा.से.यो. कोविड योद्धा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार विद्यापीठ उपकेंद्र, उस्मानाबाद येथे राज्याचे उच्चशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंचालक डाॅ.निंबाळकर, सिनेट सदस्य संजय निंबाळकर, प्र-कुलगरू डाॅ.शिरसाठ,  प्राचार्य डाॅ.जयसिंग देशमुख व इतर मान्यवर यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 

रासेयो स्वयंसेवक विक्रम माणिक राठोड यांस हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर, संचालक बाबुराव चव्हाण, संचालक रामचंद्र आलुरे आणि इतर संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहेत.

कोरोना काळात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. स्वयंसेवक विक्रम राठोड  यास मिळालेला कोरोना योध्या पुरस्कार समाजासाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांनी विक्रम राठोड यांचा गौरव केला.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा