Breaking

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

तुळजापुर शहरातील जनतेसाठी (५०% ) अर्ध्या किंमती मध्ये पिठाची गिरणीचे वाटप कार्यक्रम संपन्न.*



*तुळजापुर शहरातील जनतेसाठी (५०% ) अर्ध्या किंमती मध्ये पिठाची गिरणीचे वाटप कार्यक्रम संपन्न.*


 तुळजापूर तालुक्याचे आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष श्री  सचिन रोचकरी व श्री विनोद (पिटू)गंगणे यांच्या प्रयत्नातुन तुळजापूर शहरात व तालुक्यातील जनतेसाठी 50 टक्के सवलत दरात घरगुती पीठ गिरणी चे वाटप होत  असून .
 या माध्यमातून अनेक गरजूंना याचा फायदा तर होणारच आहे. त्याच बरोबर त्यांना छोटा लघु उद्योग प्राप्त होणार आहे या पीठगिरणी च्या माध्यमातून  महिला भगिनींना हाताला काम मिळणार आहे .
  तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही उचललेले पाऊल निश्चितच जनतेच्या हिताचे असून यापुढील काळातील तुळजापूर शहरातील जनतेसाठी विविध योजना आणून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून जास्तीत जास्त लोकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न हा आमचा सदैव राहणार आहे असे नगराध्यक्ष श्री रचिन रोचकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
  आज आम्ही केलेल्या का छोट्याशा प्रयत्नाला प्रतिसाद मिळत आहे या माध्यमातून मी शहरातील जनतेला व विशेष करून माता-भगिनींना विनंती करू इच्छितो आपणही या योजनेचा लाभ घ्यावा व स्वावलंबी बनावे या धावपळीच्या युगामध्ये आपणास आपल्याच घरी पीठ गिरणी च्या माध्यमातून अनेक कामे जलद गतीने व योग्य वेळेत व अल्प दरात प्राप्त होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे.
  आपण सर्वांनी आम्ही राबवत असलेल्या विविध योजनेत आपला सक्रिय सहभाग नोंदवून याचा लाभ घ्यावा मा.आ.राणाजगजितसिंह  पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात ,शहरात विविध योजना  आणून महाराष्ट्रातील आदर्श तालुका म्हणून तुळजापूर तालुका वाटचाल करीत आहे निश्चित पणाने आम्ही दादाच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करत राहू आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद..

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा