Breaking

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभाग ऊस पुरवठादार जितेंद्र उध्दव जाधव अपघाती निधन*


*विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभाग ऊस पुरवठादार जितेंद्र उध्दव जाधव   अपघाती निधन*

प्रदीपराव पाटील
भीमानगर प्रतिनिधी

भिमानगर ता माढा येथील हॉटेल गारवा चे मालक व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभाग ऊस पुरवठादार जितेंद्र उध्दव जाधव (वय 42) यांचे शुक्रवारी सकाळी 11.30 वा  हॉटेल गारवा समोर पुणे वरून सोलापूर कडे जाणार्या स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH 14 JL 1564 ने धडक दिली असता जितेंद्र जाधव गंभीर स्वरूपाचे जखमी अवस्थेत जाधव यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.जितेंद्र जाधव यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,आई,वडील,भाऊ असा परिवार आहे.जितेंद्र जाधव यांचा स्वभाव सतत हसतमुख असल्याने ते सर्वांचे लाडके होते.आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील,मा. कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगर कर,जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक प्रदीपराव पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा