महिलांनी आपली संस्कृती जपत विज्ञानवादी दृष्टिको
ठेवला पाहिजे:- मीनाक्षी जगदाळे-अंधारे
टेंभुर्णी प्रतिनिधी/अमोल भोसले
माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अकलूज येथे
शनिवार दि. २८ ते मंगळवार दि. ३१ ऑगस्ट अखेर
जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे व जिल्हा
कार्याध्यक्षा प्रा. मीनाक्षी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत
अकलूज येथे मोफत चार दिवशीय सौंदर्यशास्त्र कार्यशाळा
आयोजित केली असल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या
तालुकाध्यक्ष मनोरमा लावंड यांनी दिली.
महिलांच्या अंगी विविध कलागुण असतात त्या कलागुणांना
चालना देण्याच्या उद्देशाने ,महिलांनी आपल्या पायावर उभे
राहावे व स्वावलंबी बनावे यासाठी जिजाऊ ब्रिगेड अकलूज
यांनी शनिवार दि. २८ पासून चार दिवसीय मोफत
सौंदर्यशास्त्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे
यामध्ये मेकअप ,हेअर स्टाईल, ब्लिच, फेशियल, आयब्रो
,वॅक्सिंग ,साडी ट्रॅपिंग, त्वचेच्या आरोग्याबाबत माहिती
याविषयी अकलूज रत्नपुरी १० येथे दुपारी १ ते ४ या वेळेत
कार्यशाळा आयोजित केली असून शनिवार दि. २८ रोजी
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवर
महिलांच्या शुभहस्ते पूजन करून व जिजाऊ वंदनेने
कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली या कार्यशाळेला
प्रशिक्षक स्वाती जगताप यांनी उपस्थित राहून
सौंदर्यशास्त्राचे प्रशिक्षण दिले .स्वाती जगताप या टीव्ही
मालिकांमधील अनेक कलाकारांच्या मेकप वुमन असून
सन २००५ पासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत यावेळी
जिल्हा कार्याध्यक्षा मीनाक्षी जगदाळे बोलताना म्हणा
महिलांनी आपली संस्कृती जपत विज्ञानवादी दृष्टिको
ठेवला पाहिजे तर जिल्हा उपाध्यक्ष मनीषा जाधव यांनी
प्रत्येक महिलांनी अनेक कला अवगत करून स्वतः
स्वावलंबी बनावे याविषयी माहिती दिली महिलांनी रोजच्या
जीवनात स्वतःचे सौंदर्य कसे जपावे तसेच यातून लघुउद्योग
उभारून स्वावलंबी बनावे याविषयी तालुकाध्यक्ष मनोरमा
लावंड यांनी माहिती दिली
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका उपाध्यक्षा मनीषा
गायकवाड, सचिव पुनम सुसलादे,शहराध्यक्ष शुभांगी
क्षिरसागर, अकलूज शहर कार्याध्यक्षा शारदा चव्हाण, शहर
संघटक कल्पना चव्हाण ,सुवर्णा क्षिरसागर ,आशा सावंत,
सुवर्णा गोरवे आदी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने
उपस्थित होत्या . नाव नोंदणीसाठी तालुकाध्यक्षा
मनोरमा
लावंड मो 76 20 49 03 13, शहराध्यक्षा शुभांगी
क्षिरसागर मो 7219354600 यांना संपर्क साधावा असे
आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा