Breaking

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

पाटील हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना सुरू.- डॉ. राहुल पाटील


पाटील हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना सुरू.- डॉ. राहुल पाटील          

     

  टेंभुर्णी प्रतिनिधी : गणेश चौगुले



माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटल मध्ये  करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या हस्ते पोलीस कुटुंब आरोग्य योजना याचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कुटुंबीयांच्या आजारपणात उपचार घेण्यासाठी  




राज्य सरकारने सन २००५ यावर्षी पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी कुटुंब आरोग्य योजना सुरू केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यांतील महत्त्वाच्या हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला होता. याचा फायदासुद्धा पोलीस विभागातील कुटुंबीयांनी घेतला. याच आधारे यावर्षी टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शासन निविदेत २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या योजनेचा लाभ सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे.तसेच
पाटील हॉस्पिटल मध्ये कोविड लसीकरणाची सुरुवात देखील झाली आहे. या लसीकरणाचे उद्घाटन टेंभुर्णीचे नुतन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ.राहुल पाटील,विजयसिंह पाटील,   डॉ.पुजा पाटील, श्रीमती शीला भारत पाटील, व हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा