*संभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व गूणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
दि.30 ऑगस्ट संभाजी ब्रिगेडच्या वतीने कंधार शहरात कोरोना काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांना दुहेरी परीक्षा द्यावी लागली. एकीकडे जीवन मरणाची परीक्षा होती तर दुसरीकडे जीवन जगण्याची परीक्षा होती. त्यामुळे कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे विशेष कैतुक करायला हवे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव यांनी केले. तसेच स्वतःचे नातेवाईक कोरोनाने प्राण सोडत असताना काही लोकांनी त्यांची काळजी घेतली नाही पण कोरोना योद्धयांनी मात्र स्वतःच्या प्राणावर उदार होत कोरोना रुग्णांची काळजी वाहिली त्यामुळे तुकोबांच्या उक्तीनुसार हे कोरोना योद्ध्येच खरे संत आहे असेही डॉ बालाजी जाधव संभाजी ब्रिगेड कंधार आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यात यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी केवळ उच्च राहणीमान ठेवूनच जमणार नाही तर त्यासोबतच त्यांनी त्यांचे विचारही उच्च ठेवायला हवे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड गर्दी केली होती. पावसामुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो की काय असे वाटत असताना आयोजकांनी तितक्याच जोरदारपणे हा कार्यक्रम संपन्न केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड.मनोज आखरे अध्यक्ष तर उद्घाटक सुधीर देशमुख संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष स्वागताध्यक्ष मा.सुभाष कोल्हे,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष,नांदेड मा.बळीराम पवार मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष नांदेड तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.बालाजी जाधव प्रदेश संघटक तथा प्रसिद्ध व्याख्याते संभाजी ब्रिगेड, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मनोहर भोळे पोलीस निरीक्षक पडवळ साहेब कंधार रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल तोटावाड साहेब तूषार जाधव बळी डिकळे गंगाधर हिवराळे साहेब अमोल चव्हाण उद्धवराव सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ नानाराव कल्याणकर जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ संकेत पाटील लोकसभा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड श्याम पाटील जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड सचिन पाटील इंगोले संस्थापक अध्यक्ष राजमुद्रा संघटना संगीताताई विजय पा.धोंडगे मा.जि.प.सदस्य अरुणा जाधव जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड विद्या पाटील जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड कृष्णा मोरे जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी संभाजी ब्रिगेड आदित्य चव्हाण डॉक्टर संजय केंद्रे अँड सतीश कुमार जाधव जिल्हा सचिव मराठा सेवा संघ शिवराज मंगनाळे मराठा सेवा संघ कंधार तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे , सतिश धुमाळ,दशरथ डरगे,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष ओमराजे शिंदे जिल्हा उपाध्यक्ष डॉ गणेश पवळे मुखेड तालुकाध्यक्ष प्रदिप इंगोले अनिल दापकेकर यांची उपस्थिती होती
आयोजक संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे शहराध्यक्ष विकास लुंगारे धनंजय पाटील कौसल्ये ता.कार्यध्यक्ष कैलास पाटील पवळे कृष्णा गोटमवाड संभाजी पाटील गायकवाड रमेश बस्वदे कृष्णा वरपडे किरण कल्याणकर संभाजी कदम गजानन गडमवाड देवानंद मोरे नितीन कौसले स्वप्नील राहेरकर शिवा तोंडचीरे विशाल पाटील कौसल्ये संतोष पाटील बोरोळे माधव लूगारे पांडुरंग जाधव शैलेश लुंगारे शैलेश जाधव जीवन लुंगारे स्वप्निल पांचाळ ओमपुरी बळवंत कदम साईनाथ गडमवाड शंकर तेलंग श्रीराम पवळे अविनाश कळकेकर सचिन कदम व संभाजी ब्रिगेड कंधार तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा