ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज टेंभुर्णीचे एच. एस. सी परीक्षत यश
टेंभुर्णी येथील श्री. स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी, संचलित ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज टेंभुर्णी कॉलेजचा एच एस सी परीक्षेत पहिल्याच वर्षी उत्कृष्ट यश संपादन केले
आहे.कॉलेज मार्फत एकूण 25 विद्यार्थी परीक्षेला बसले होते 22 विद्यार्थी नियमित, 2 विद्यार्थी खाजगी( फॉर्म नं.17) व एक विद्यार्थी रिपीटर होता.यापैकी 3 विद्यार्थी विशेष योग्यते सह उत्तीर्ण 18 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व 4 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. कु. वैष्णवी केसरे-80% गुण घेऊन विद्यालयात प्रथम आली.चि. सुरेश शेळके - 79% गुण घेऊन द्वितीय आला. चि.ऋषिकेश थोरात - 77.33% गुण घेऊन तृतीय आला आहे.
या यशाबद्दल बद्दल संस्थेचे संस्थापक हरिश्चंद्र गाडेकर, सचिव अर्चना गाडेकर, प्रिन्सिपल रेखा गाडेकर ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभवबाप्पू कुटे, उपाध्यक्ष सुभाष बापू इंदलकर, कॉलेजचे कॉर्डिनेटर संदीप साळवे व विविध समितीचे पदाधिकारी,पालक यांनी मुलांचे विशेष कौतुक केले. व इयत्ता बारावी मधील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
*****************Advt***********************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा