Breaking

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

कोरोनामुळे दगावलेल्या पालकांच्या वारसांच्या शैक्षणिक मदतीसाठी माढेश्वरी बँकेत अर्ज करावेत - अशोक लुणावत26 सप्टेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बबनदादांच्या हस्ते होणार वितरण


कोरोनामुळे दगावलेल्या पालकांच्या वारसांच्या शैक्षणिक मदतीसाठी माढेश्वरी बँकेत अर्ज करावेत - अशोक लुणावत


26 सप्टेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बबनदादांच्या हस्ते होणार वितरण


माढा / प्रतिनिधी - माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातील जे पालक कोरोनामुळे दगावलेले आहेत त्यांच्या वारसांना शैक्षणिक साहित्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने बँकेचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 85 वारसांना 4 लाख 95 हजार रुपये रकमेच्या धनादेशाचे वाटप माढेश्वरी बँक सांस्कृतिक मंडळाकडून केले आहे.अद्यापही जे वारस पात्र आहेत त्यांनी जवळच्या माढेश्वरी अर्बन बँकेच्या शाखेत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून 25 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बँकेचे व्हा.चेअरमन अशोकशेठ लुणावत यांनी केले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे अनेक पालक दगावले आहेत.काही कुटुंबातील दोघा पालकांपैकी एक जण दगावले आहे तर काही कुटुंबातील दोघेही दगावले आहेत त्यामुळे अशा पालकांच्या वारसांच्या शैक्षणिक साहित्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे.पात्र वारसांनी त्वरित आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून जवळच्या माढेश्वरी बँकेच्या शाखेत अर्ज करावेत म्हणजे 26 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पात्र वारसांना धनादेशाचे वितरण आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करता येईल असे त्यांनी सांगितले.

ज्या कुटुंबातील आई किंवा वडील एक जण दगावले आहे त्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 हजार रुपये आणि ज्या कुटुंबातील आई-वडील दोघेही कोरोनामुळे दगावले आहेत त्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 हजार रुपये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.माढेश्वरी अर्बन बँकेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या माढा येथील मुख्य कार्यालयात चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असून या सभेची लिंक सभासदांना व्हाट्स ॲपच्या विविध ग्रुपवर पाठविण्यात येणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी सांगितले आहे.

फोटो ओळी- 1) आमदार बबनराव शिंदे.

2) व्हा.चेअरमन अशोक लुणावत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा