जल जीवन मिशन अंतर्गत माढा मतदारसंघातील ८ गावातील नळ पाणी पुरवठा योजनेस 3 कोटी 70 लाख निधी मंजूर - आ.बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी।
जल जीवन मिशन योजनेतून माढा तालुक्यातील 3 गावांना व माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील 1 व माळशिरस तालुक्यातील 4 अशा एकूण ८ गावांना 3 कोटी 70 लाख 60 हजार रू. मंजूर झाले असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ठ पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांना जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी आ.बबनराव शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
यामध्ये माढा तालुक्यातील 1) टाकळी (टें) येथे विहीर,पाईपलाईन,उंच टाकी, वितरण व्यवस्था यासाठी रु. 84 लाख 94 हजार 409 रुपये, 2) शेडशिंगे येथे विहीर,पाईपलाईन,उंच टाकी, वितरण व्यवस्था यासाठी रु. 82 लाख 54 हजार 755 रुपये, 3) विठ्ठलवाडी येथे उंच टाकी, वाढीव वितरण व्यवस्था यासाठी रु. 24 लाख 89 हजार 778 रुपये, तसेच पंढरपूर तालुक्यातील 1) व्होळे येथे विहीर,पाईपलाईन,उंच टाकी, वितरण व्यवस्था यासाठी रु. 91 लाख 14 हजार 284 रुपये, तसेच माळशिरस तालुक्यासाठी 1) खळवे येथे पाण्याची टाकी,पाईपलाईन, वितरण व्यवस्था यासाठी रु. 20 लाख 924 रुपये,2) माळखांबी येथे पाण्याची टाकी,पाईपलाईन, वितरण व्यवस्था यासाठी रु. 24 लाख 77 हजार रुपये,3) नेवरे येथे पाण्याची टाकी,पाईपलाईन, वितरण व्यवस्था यासाठी रु. 24 लाख 97 हजार 146 रुपये,4) उंबरे (वे) येथे पाण्याची टाकी,पाईपलाईन, वितरण व्यवस्था यासाठी रु. 17 लाख 31 हजार 750 रुपये असा एकून 3 कोटी 70 लाख 60 हजार एवढा निधी मंजूर झाला असल्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा