तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे त्यांची तात्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करावी.!: संघटक-नंदकुमार ताडें
श्रीगोंदा:नितीन रोही,
शिवसैनिक नंदकुमार ताडे व संतोष शिंदे तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विश्रामगृहावर विविध विषयाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. विद्यमान शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी ओ. एन. जी. सी. गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांतून राज्यभर फिरत आहे.
त्यांच्या दडपशाही व असंवेदनशील कृत्यामुळे शिवसैनिकांची तसेच तालुका कार्यक्षेत्रात कार्यरत पदाधिकाऱ्यांची परीणामी संघटनेची बदनामी झाली आहे. मुळात आमचा बाळासाहेब दूतारे यांच्या निवडीवरच आक्षेप आहे. असे मत यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना नंदकुमार ताडे यांनी व्यक्त केले.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, १२ डिसेंबर १९८४ साली श्रीगोंदा तालुक्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ करून, खांद्यावर घेतलेला भगवा तालुक्यात झंजावात बनून फिरवला. शहरासह तालुक्यातील खेडोपाडी पोहचतांना अहोरात्र कष्ट घेतले आहेत. नगरसेवक पदापासून नगराध्यक्ष पदापर्यंत सर्व खरतड प्रवास होता. त्याच बरोबर तालुक्यातील विविध गावांमध्ये पक्षामार्फत निवडून आलेले पदाधिकारी तेंव्हापासून संघर्ष करित आहेत अनं, करत राहणार आहेत.
मला पद नको. मी फक्त शिवसैनिक म्हणून काम करतोय आणि यापुढेही शिवसैनिक म्हणूनच कार्यरत राहणार आहे. मी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या विचाराशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता आहे. असे ताडे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
संघटनेच्या नियमावलीनुसार शिवसेनेतून पदाधिकारी निवडण्याची पद्धत आहे. मात्र, तालुक्यात निवडलेला तालुकाध्यक्ष हा शिवसैनिकांना विचारात न घेता अपवादात्मक निवडला असल्याचे ताडे यांनी या वेळेस पत्रकारांना सांगितले. जर, बाळासाहेब दुतारे हे विद्यमान तालुकाध्यक्ष पुन्हा प्रक्रियेतून निवडून पदाधिकारी झाले.? तर, आम्ही त्यांचा स्वीकार करु. असेही त्यांनी या वेळेस विशेष नमूद केले.
यापूढे बोलतांना ताडे यांनी सांगितले की, मागे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सभासद नोंदणीची सर्व जिम्मेदारी आमच्यावर टाकण्यात आली. त्यानुसार प्रक्रिया करण्यात आली. विविध गावांमध्ये सकाळ, संध्याकाळ सभा घेऊन, सभासद नोंदणी करण्यात आली. मात्र, आम्हाला विश्वासात न घेता, सभासद नोंदणीचे सर्व फार्म घेऊन विद्यमान तालुकाध्यक्ष व त्यांचा एक जवळचा कार्यकर्ता वरिष्ठांना भेटल्याचे ताडे यांनी सांगितले.
व्हिडीओ क्लिप बाबत बोलतांना नंदकुमार ताडे यांनी नमूद केले की, तालुक्यातील एकनिष्ठ शिवसैनिकांपासून दुर होत चाललेले बाळासाहेब दुतारे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात शहरालगत होत असलेल्या ओ.एन.जी.सी. गॅस कंपनीच्या संदर्भात बाळासाहेब दुतारे व कांतीलाल कोकाटे नामक एक व्यक्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गैरसंविधानिक भाषा वापरतांना चित्रित झाले आहेत. अशा गैरवर्तनांमुळे तालुक्यातील शिवसेना बदनाम होत असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांसह संघटनेला डाग लागत आहे. बाळासाहेब दुतारे यांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट खंडणी मागितल्याचे समोर येत आहे. असा अप्रत्येक्ष आरोप यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पत्रकारांसमोर केला आहे.
अशा पदाधिकाऱ्याला तात्काळ वरिष्ठांनी पदावरून बडतर्फ करून, तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या आवडीचा व कार्यकुशल तालुकाप्रमुख नेमावा.! अशी इच्छा यावेळी सर्वांनी व्यक्त केली. जिल्हा संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख हे माझ्या खिशात असल्याचे वक्तव्य अनेकदा दुतारे यांनी केले आहे. याबाबत तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नमूद व्हिडीओ क्लिपच्या माध्यमांतून संघटनेची राज्यभर बदनामी होत आहे. वरिष्ठांनी तात्काळ यावर निर्णय घ्यावा अन्यथा हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडनार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर परिणाम करणारे दुष्कृत्य बाळासाहेब दुतारे यांनी केले आहे. त्यामुळे तात्काळ त्यांच्याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा. असा एक सूर सर्वांनी काढला.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विषयी अपशब्द बोलणारे नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयापुढे तालुक्यातील शिवसैनिकांनी जाळला होता. त्यावेळी तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे कोणत्या बिळात दडले होते ? असा सवाल नंदकुमार ताडे यांनी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित केला. तसेच, सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणारा शिवसैनिक नंदकुमार ताडे आहे. पोलिसांना बघून पळणारे आम्ही नसून, जनतेच्या प्रश्नासाठी अनेकदा पोलीस कस्टडीत बसलेलो आहोत. असेही त्यांनी मत व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह संतोष शिंदे, नंदकुमार ताडे, नाथा पवार, समीर काजी, शिवराज ताडे, अनिल हिरडे, दादा चव्हाण, मच्छिंद्र गाढवे, रमेश चोर सह पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा