*बळीराजा शेतकरी संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्ष प्रदीप सरडे तर माढा तालुका उप अध्यक्ष पदी राजेंद्र डोके यांची निवड*
टेंभुर्णी प्रतिनिधी /AJ 24 Taas
टेंभुर्णी येथे बळीराजा शेतकरी संघटने ची आज सकाळी बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये सामाजिक संघटनेचे काम करण्यासाठी करमाळा माढा येथून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी बळीराजा शेतकरी संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदी प्रदीप सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कनेरगाव येथील उद्योजक राजेंद्र पांडुरंग डोक्यांची माढा तालुका उपाध्यक्ष म्हणून निवडी करण्यात आली या वेळी युवा प्रदेशाध्यक्ष श्री नितीन बागल व पश्चिम महाराष्ट्राच्या युवा महिला आगाडीच्या अध्यक्ष सौ. सुरेखा ताई पाटील मा. श्री रामदास खराडे जिल्हा प्रमुख बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर यांच्या हस्ते निवडी चे पत्र देऊन निवड झाल्याचे घोषित करण्यात आले या वेळी करमाळा तालुका अध्यक्ष म्हणून श्री प्रदीप सरडे यांची व श्री. राजेंद्र पांडुरंग डोके यांची माढा तालुका उपाध्यक्ष पदी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदी निवड करण्यात आल्याने त्यांचा संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी प्रमुखउपस्थित मध्ये श्री.सुरज तानाजी पाटील श्री. रुपेश वाघमारे शेठ. प्रोफाइटर. लक्ष्मी कृषी केंद्र टेंभुर्णी श्री अण्णासाहेब महाडीक साहेब श्री अक्षय शिंदे साहेब श्री.विकास शेंडे साहेब उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा