आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रवण लावंड ३२ सुवर्णपदकांचा मानकरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार
वडूज प्रतिनिधी शरद कदम
दहाव्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅटमध्ये ४८ते ५१ वजनी गटात दरुज ता. खटाव येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रवण लावंड याने सुवर्णपदकांची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, खजिनदार मुकेश सोनवाणे, संकेत धामंडे, साहेबराव ओहोळ, पौर्णिमा तेली, विकास बडेकर, सचिन लावंड, सौ.प्रियंका लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
दि. १ ते ३ सप्टेंबर महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशिएनच्या दहाव्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट मध्ये महाराष्ट्रातील ३० जिल्हातील ३५० खेळाडुंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये श्रवण लावंड याने सुवर्णपदकाची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रवण याने वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय मध्ये २ , राष्ट्रीय मध्ये १५ व राज्यस्तरीय स्पर्धेत १५ सुवर्णपदके असे ३२ पदकाचा मानकरी ठरला असून सातारा जिल्ह्यासह दरुज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
श्रवण लावंडच्या या यशाबद्द्ल आ.शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, सुनील गोगटे, सुरेंद्र प्रताप सिंग, किशोर येवले, अॅड.विशाल सिंग, संदीप पाटील, अनिल ढिकले साहेब, प्रकाश पार्टे, अबू चाऊस, संजीव वरे, गणेश बोराडे, कृष्णकांत कदम, दरुजच्या सरपंच नंदा खामकर, मनोहर लावंड आदीसह ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा