वीस वर्षे देश सेवा करून भारतीय सैनिक राजुदास राठोड आपल्या जन्मभूमी परतणार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
उमरा ता.लोहा येथील भूमिपुत्र भारतीय सैनिक श्री.राजूदास लक्ष्मण राठोड हे आपल्या २० वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
वीस वर्षे देशाची सेवा करून ३-सप्टेंबर रोजी राजुदास राठोड हे आपल्या जन्मभूमीत येत आहेत.त्यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जंगी स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
नांदेड रेल्वे स्टेशन येथे दि.३-सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांचे आगमन होईल.सर्व देश भक्तांनी नांदेड रेल्वे स्टेशन व त्यांच्या मूळ गावी उमरा येथे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा