माढेश्वरी बँकेच्या मयत खातेदाराच्या वारसाला दोन लाख रुपयांची मदत आ.बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी।
माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव बँक माढा शाखा करकंब यांच्यावतीने खातेदारा च्या वारसास मदत म्हणून अपघाती विम्याचा दोन लाख रुपयांचा धनादेश बँकेचे चेअरमन तथा आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते मयताच्या पत्नीस देण्यात आला
माढेश्वरी बँकेच्या वतीने प्रत्येक खातेदाराचा प्रधान मंत्री अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरून वार्षिक बारा रुपये विमाहप्ता भरण्यात येतो असाच विमा उतरवलेल्या करकंब येथील खातेदार विठ्ठल ऋषीनाथ शिंगटे यांचा टेंभुर्णी -पुणे रोडवर 8 एप्रिल 2021 रोजी अपघाती मृत्यू झाला होता ते करकंब येथील बँक शाखेचे खातेदार होते त्याचे सेविंग खाते होते बँक शाखेच्यावतीने यांच्या विम्यासाठी वार्षिक 12 रुपये भरून प्रधानमंत्री अपघाती विमा उतरवला होता त्याचा पाठपुरावा करून दोन लाख रुपयाचा अपघाती विमा मिळवून घेतला त्याचा धनादेश विठ्ठल शिंगटे यांच्या पत्नी पूजा शिंगटे यांच्याकडे बँकेचे चेअरमन तथा आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
माढेश्वरी बँकेमार्फत विविध उपक्रम राबवून खातेदाराला जास्तीत जास्त संरक्षण मिळवून देण्याचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे व होत आहे कोरोना रोगाणे मयत झालेल्या पालकांच्या 80 पाल्यास मदत देण्यात आली आहे यामध्ये एक पालक मयत झालेल्यास5555व दोन्ही पालक मयत झाल्यास 10555 रुपये मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली आहे यामुळे घरावर कोसळलेल्या दुःखामध्ये माढेश्वरी बँकेच्या वतीने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून नेहमीच मदत केली जाते असे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे म्हणाले
यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक लूनावत मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय मुळे संचालक गणेश काशीद करकम शाखा अधिकारी जयंत खुर्द सेवक प्रदीप शिंदे मोहन शिंदे नितीन सरडे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा