*तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आले*
दि,२१ सप्टेंबर २०२१, रोजी तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने मा तहसीलदार श्री तांदळे साहेब यांना निवेदन देण्यात आले , या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,तुळजापूर तालुक्यातील बोगस अपंग प्रमाणपत्र प्रहार संघटनेकडे मिळालेले आहेत, त्या प्रमाणपत्राची तपासणी करून जर ते प्रमाणपत्र खोटे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी जर 30 दिवसाच्या आत याची शहानिशा झाली नाही, तर प्रहार संघटनेच्या वतीने लोकशाही पद्धतीने तुळजापूर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष
श्री शशिकांत मुळे यांनी दिला आहे, यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे , तुळजापूर शहर अध्यक्ष श्री नागेश कुलकर्णी , सिद्राम तोडकर, गणपती कुंभार , नागनाथ मुळे , श्रीकांत कावरे , बालाजी धोत्रे , सुनिता सूर्यवंशी , अलका इटकर आधी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे सोलापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा